दुर्मिळ कागदपत्रे  

   

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे..

(१२ जुलै १८६४ – ३१ डिसेंबर १९२६). मराठीतून इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान. इतिहाससंशोधक म्हणून विशेषेकरून ते मान्यता पावले. 
        
त्यांचा जन्म पुण्यास झाला. १८८२ मध्ये पुण्यातून ते मॅट्रिक झाले. मुंबईस एल्फिन्स्टन कॉलेज व पुण्यास डेक्कन कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९० मध्ये बी.ए.झाले. १८९१ मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले, पण सु.अडीच वर्षांनी १८९३ मध्येच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीही, कसलीही नोकरी अशी केली नाही. विद्यार्थिदशेतच १८८९ मध्ये त्यांचा विवाह झाला होता, पंरतु १८९२ मध्येच त्यांची पत्नी निवर्तली आणि त्याच वेळी त्यांनी दुस-या विवाहाचा विचारही  न करता स्वतःस प्रापंचिक पाशातून कायमचे सोडवून घेतले. पुढे ते पुणे, सातारा, वाई, धुळे, मिरज, तळेगाव-दाभाडे इ. ठिकाणी कमी-अधिक वर्षे वास्तव्य करून असले,

पुढे वाचा:इतिहासचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे

   

दुर्मिळ कागदपत्रे : अक्षरानुक्रम  

    आरत्या - मराठी
    अंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी
    भक्ती - मराठी
    चरित्रें - मराठी
    धर्मशास्त्र - संस्कृत
    धर्मशास्त्र - प्रायश्चित - संस्कृत
    धर्मशास्त्र - स्मृती - संस्कृत
    गद्य - मराठी (बखर)
    गद्य - मराठी - मोडी (बखर)
    हिंदी
    हृदय - मंत्र - संस्कृत
    इतिहास - मराठी
    जंत्री - मोडी
    ज्योतिष - मराठी
    कथा - संस्कृत
    कथा पुराणें - मराठी
    कवच - मंत्र - संस्कृत
    काव्य - मराठी
    कोश - मराठी
    कोश - संस्कृत
    महात्म्य - मराठी
    महात्म्य - संस्कृत
    मराठी
    मोडी
    नित्यकर्म - संस्कृत
    पद्धती - संस्कृत
    पत्रे - मराठी
    पत्रे - मोडी
    पत्रे - फारसी - मराठी - मोडी
    प्रयोग - संस्कृत
    पुराण - मराठी - संस्कृत
    पुराण - संस्कृत
    पुराणोक्त - पूजा - संस्कृत
    संस्कृत
    संन्यास पद्धती - संस्कृत
    स्मार्त  - संस्कृत
    स्मार्त - विधी - संस्कृत
    स्तोत्र - संस्कृत
    स्तोत्र - स्तुती - भूपाळ्या - मराठी
    स्तोत्रे - आरत्या - मराठी
    वेद - संस्कृत
    वेदान्त - मराठी
    वेदान्त - संस्कृत
    विद्या व कला - मराठी
    व्याकरण - संस्कृत
    याज्ञिक - संस्कृत
    याज्ञिक - विधी - संस्कृत
    याज्ञिकी ग्रंथ - मराठी
    यात्रा - मराठी

 

हिंदी